Home > Political > "ममता बॅनर्जी इस्लामिक दहशतवादी" भाजपच्या मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

"ममता बॅनर्जी इस्लामिक दहशतवादी" भाजपच्या मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

ममता बॅनर्जी इस्लामिक दहशतवादी भाजपच्या मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य
X

पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमध्ये परस्पर युद्ध सुरू झाले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले उत्तर प्रदेशचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इस्लामिक दहशतवादी म्हटल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

रविवारी शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूविरोधी असल्याचा आरोप करताना त्यांना इस्लामी दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे. ममता बॅनर्जी या देशासाठी सर्वात मोठा धोका आहेत अशी टीकाही शुक्ला यांनी केली आहे. इतकच नाही तर पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांना बांगलादेशमध्ये आश्रय घ्यावा लागेल असंही शुक्ला म्हणाले आहेत.

शुक्ला म्हणाले की, भारतात केवळ 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' बोलणार्या मुस्लिमांचाच सन्मान केला जाईल. बहुसंख्य लोक बंगालमध्ये भाजपबरोबर उभे आहेत. ममता केवळ मुस्लिमांच्या नेत्या राहिल्या आहेत. त्या हिंदूंवर अत्याचार करत आहेत. तेथील लोकांनी निवडणुकीत त्याला सत्तेतून काढून टाकायचे मनापासून तयार केले आहे.

Updated : 18 Jan 2021 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top