Home > Political > ममता बॅनर्जी यांच्यावर कुणी केला हल्ला?

ममता बॅनर्जी यांच्यावर कुणी केला हल्ला?

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला, पायाला दुखापत झाल्याने सुरक्षा रक्षकांनी गाडीत उचलून ठेवले

ममता बॅनर्जी यांच्यावर कुणी केला हल्ला?
X

पश्चिम बंगालच्या मुख्येमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे हल्ला करण्यात आला आहे. त्या आपला विधानसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या असल्याचं समजतंय. या संदर्भात एनडीटीव्ही ने वृत्त दिलं आहे. यामध्ये विविध माध्यमांवर दाखवण्यात आलेल्या दृश्यामध्ये ममता बॅनर्जी यांना त्यांचे सुरक्षा रक्षक गाडीत उचलून ठेवत असल्याचं दिसून येत आहे.

ममता यांच्या पायाला जखम झाली आहे. ममता बॅनर्जी यांचा आज नंदीग्राम येथे दौरा होता. मात्र, या हल्ल्यानंतर त्या कोलकाता येथे परत आल्या आहेत. ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचेच पुर्वीचे सहकारी राहिलेले आणि भाजप मध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागं कुणाचा हात आहे? हल्ला कुणी केला? या हल्ल्यामागचा हेतू काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Updated : 10 March 2021 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top