Home > Political > फडणवीस ही नको व शिंदे ही नको, पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा..

फडणवीस ही नको व शिंदे ही नको, पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा..

फडणवीस ही नको व शिंदे ही नको, पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा..
X

सध्या राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे हे जरी चर्चेत असले तरी आता या सगळ्यांमध्ये आणखीन एका नावाची चर्चा सुरू झाली आहे. ते नाव आहे पंकजा मुंडे यांचे. आज पंकजा मुंडे बीड मधील आष्टी येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. या कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा अशा घोषणा दिल्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा मुंडे कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली असल्याचं समोर आले आहे.

तर झालं असं की, कार्यक्रम सुरू असताना कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा अशा घोषणा दिल्या. या घोषणेनंतर पंकजा मुंडे यांना हसू अनावर झालं. आणि त्या खळखळून हसल्या. कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी होते असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना दाद दिली. सध्या राज्याच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे येनकेन प्रकारे हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात दुसरीकडे बीडमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा मात्र काही वेगळीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे असा संघर्ष पाहायला मिळेल की काय? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Updated : 21 Jun 2022 4:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top