Home > Political > Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापुजा संपन्न..

Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापुजा संपन्न..

Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापुजा संपन्न..
X

आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते ही पूजा पार पडली. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही महापूजा पार पडली.

खरंतर मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींमुळे यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात पार पडणारी शासकीय महापूजा कोण करणार? याची राज्यात मोठी चर्चा होती. अखेर राज्यात मोठं राजकीय नाट्य घडल्यानंतर एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने काही अटी-शर्तींवर मुख्यमंत्री शिंदे यांना पूजा करण्यास संमती दिली. आणि काल उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे या पंढरपूर येथे पोहोचल्या व त्यांच्या हस्ते ही पूजा पार पडली.

Updated : 10 July 2022 1:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top