Home > Political > बंडखोर शिंदे गटाला धक्का..

बंडखोर शिंदे गटाला धक्का..

बंडखोर शिंदे गटाला धक्का..
X

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. त्यातच शिंदे गटाने भारत गोगावले यांची विधिमंडळ प्रतोदपदी निवड केली होती. मात्र नरहरी झिरवळ यांनी बंडखोर शिंदे गटाला हादरा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भारत गोगावले यांची विधिमंडळ प्रतोदपदी निवड केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी शिंदे गटाच्या बारा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान शिवसेनेने अजय चौधरी यांची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली होती. मात्र त्याला एकनाथ शिंदे यांना आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतरही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाला धक्का देत उध्दव ठाकरे यांचा शिवसैनिक अजय चौधरी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते होते. त्यामुळे त्यांनी प्रतोदपदी भारत गोगावले यांची निवड केली होती. मात्र आता शिवसेनेने अजय चौधरी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करत एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला हा सर्वात मोठा हादरा मानला जात आहे.

विधिमंडळ सचिवांनी काढलेल्या पत्रामध्ये अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मंजूरी दिली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 24 Jun 2022 5:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top