Home > Political > ग्राम पंचायत निवडणूक : पाटोद्याच्या भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव

ग्राम पंचायत निवडणूक : पाटोद्याच्या भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव

ग्राम पंचायत निवडणूक : पाटोद्याच्या भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव
X

पाटोदा गावाला राज्यभर ओळख करून देणारे भास्कर पेरे पाटलांच्या ग्रामपंचायत निकालाने पेरेंना मोठा धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीतून भास्कर पेरे पाटील यांनी माघार घेतली होती, तर त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. मात्र पेरे पाटील यांच्या मुलीला अनुराधा पेरे पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

भास्कर पेरे-पाटील यांचा तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तिन जागांसाठी निवडणू झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले आहे. येथील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी विजय मिळवला आहे. भास्कररावांच्या मुलीचा पराभव झाला आहे.

Updated : 18 Jan 2021 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top