Home > Political > शपथ घेताना एकालाही झाली नाही आईची आठवण...

शपथ घेताना एकालाही झाली नाही आईची आठवण...

शपथ घेताना एकालाही झाली नाही आईची आठवण...
X

आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सोहळा मुंबईतील राजभवनात पार पडला. यावेळी शिंदे यांच्या गटातील आणि भाजपच्या प्रत्येकी 9-9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या 18 मंत्र्यांमध्ये एकाही महिलेचा समावेश नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकाच नाही तर आमदारांच्या या शपथविधी वरून देखील समाजमाध्यमांवर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. एकाही आमदाराने शपत घेताना आपल्या आईचा उल्लेख केला नाही. खरतर मागचे काही शपथविधी सोहळे आपण पाहिले तर अनेकांनी मंत्रिपदाची शपत घेताना आपल्या वडिलांच्या नावासोबत आपल्या आईचे देखील नाव घेतले होते. अनेकांनी आपल्या आईचा उल्लेख आवर्जून केला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपत घेतली. यावेळी पार पडलेल्या शपथविधीवेळी त्यांनी आपल्या आईचा उल्लेख केला नव्हता. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून यावेळी देखील कोणालाही आपल्या आईची आठवण झालेली दिसत नसल्याची चर्चा सामाजमाध्यमांवर सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात महिलांना संधी का नाही?

आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सोहळा मुंबईतील राजभवनात पार पडला. यावेळी शिंदे यांच्या गटातील आणि भाजपच्या प्रत्येकी 9-9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या 18 मंत्र्यांमध्ये एकाही महिलेचा समावेश नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ज्या महाराष्ट्राने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण दिले. त्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये एकही महिला नाही. अलिकडे अनेक राजकीय पक्ष महिला प्रश्नांना आणि महिलांना राजकीय प्रतिनिधीत्व म्हणून संधी देताना पाहायला मिळतात. अनेक योजना खासकरून महिलांना केंद्रीत ठेऊन केल्या जातात. मात्र, पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला नाही. त्यामुळं महिला वर्गात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

भाजप आमदार...

सुधीर मुनगंटीवार

चंद्रकांत पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

गिरीश महाजन

अतुल सावे

विजयकुमार गावित

मंगलप्रभात लोढा

सुरेश खाडे

रवींद्र चव्हाण

एकनाथ शिंदे गट मंत्री...

दादा भूसे

संदीपान भूमरे

उदय सामंत

तानाजी सावंत

दीपक केसरकर

शंभुराजे देसाई

अब्दुल सत्तार

गुलाबराव पाटील

संजय राठोड

Updated : 2022-08-09T12:52:53+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top