मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मानधनात आणि गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल रुपये 2 हजार पर्यंत तर गट प्रवर्तकांना 3 हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येतील. यासाठी 170 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. 1 जुलै पासून ही वाढ लागू होईल. सध्या राज्यात ग्रामीण आणि नागरी भागात 65 हजार 740 आशा स्वयंसेविकांची पदे भरलेली आहेत.
Updated : 25 Jun 2020 5:31 PM GMT
Next Story