Home > Political > यूट्यूबवर मुस्लीम महिलांचा थेट लिलाव; शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींच आयटी मंत्र्यांना पत्र

यूट्यूबवर मुस्लीम महिलांचा थेट लिलाव; शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींच आयटी मंत्र्यांना पत्र

यूट्यूबवर मुस्लीम महिलांचा थेट लिलाव; शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींच आयटी मंत्र्यांना पत्र
X

सोशल मिडियावर महिलांना 'ट्रोल' करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण आता एका विशिष्ट समाजातील महिलांना 'ट्रोल' (troll)करून, त्यांची बदनामी करण्याच्या घटना समोर येत आहे. ट्विटर आणि काही सोशल साईडवर सद्या 'सुल्ली डील्स' (Sulli Deals) हा शब्द चर्चेचा विषय बनला असून, या माध्यमातून मुस्लीम महिलांना टार्गेट करून, त्यांची बदनामी केली जात आहे. विशेष म्हणजे अशा बदनामी करणाऱ्या डीजीटल प्लॅटफॉर्मवर कोणतेही कारवाई होत नसल्याने शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. तसेच चतुर्वेदींनी कडक कारवाईची मागणी केली आहे.

एका विशिष्ट समाजातून येणाऱ्या महिलांना लिबरल डॉग (Liberal Doge) आणि सुली डील (Sulli Deals) च्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आल्याचे प्रियांका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे अनेक महिलांना सामाजिक व्यासपीठ सोडावे लागले. प्रियांका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) पुढे म्हणाल्या की, या प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे दुःखद आहे, आणि यातील गुन्हेगारांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे.

शेकडो मुस्लिम महिलांचे छायाचित्र 'सुल्ली डील्स' (Sulli Deals) नावाने 4 जुलै रोजी एका अ‍ॅपवर अपलोड करण्यात आले. ही छायाचित्रे अपलोड कोणी केले हे अद्याप उघडकीस आली नाही, पण सुल्ला किंवा सुल्ली हा मुस्लीम समाजातील एक अपमानजनक शब्द आहे, जो मुस्लिमांसाठी वापरला जातो. त्यांनतर पाकिस्तानी आणि भारतीय मुस्लिम महिलांचा आभासी लिलाव ईदच्या दिवशी लिबरल डॉग नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून (youtube channel) करण्यात आला. हे यूट्यूब चॅनेल रितेश झा नावाच्या व्यक्तीने तयार केले आहे. आभासी लिलावादरम्यान मुस्लिम महिलांवर अश्लील टिप्पण्याही करण्यात आल्या. त्यांच्या नावापुढे दर सुद्धा ठेवण्यात आले. लिबरल डॉगच्या थेट व्हर्च्युअल लिलावाच्या एक दिवसानंतर, ट्विटरवरही मुस्लिम महिलांचा असाच व्हर्च्युअल लिलाव घेण्यात आला.

सुली डील प्रकरण समोर आल्यानंतर यातील पीडीतांनी नोएडामध्ये एफआयआर दाखल केल्या. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली महिला आयोगाने सुद्धा दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली होती. गुन्हा दाखल असला तरीही आजपर्यंत या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, पोलिसांनी ओपन सोर्स प्लॅटफॉर्म गिटहबला नोटीस पाठवून मुस्लीम महिलांच्या व्हर्च्युअल लिलावाची माहिती मागितली होती. मात्र गिटहब कडून कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आतापर्यंत एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

Updated : 2 Aug 2021 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top