Home > Political > 'काळ्या नवरीचा मेकअप केल्यासारखा अर्थसंकल्प' भाजप प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली..

'काळ्या नवरीचा मेकअप केल्यासारखा अर्थसंकल्प' भाजप प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली..

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी ''एका कृष्ण रंगाच्या वधूला ब्युटी पार्लरमध्ये नेऊन तिला चांगला मेकअप करून सादर केल्याचे दिसते'' असे महिलांचा अपमान करणारे वादग्रस्त विधान केल्याने महिला कांग्रेस अध्यक्ष सुश्री नेट्टा डिसूज़ा यांनी संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे.

काळ्या नवरीचा मेकअप केल्यासारखा अर्थसंकल्प भाजप प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली..
X

राजस्थानमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी राजस्थानच्या बजेटची तुलना महिलेच्या वर्णाशी करत महिलांविषयी केलेल्या अपणामजनक वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पुनिया यांच्या या वक्तव्यानंतर राजस्थानमधील राजकीय पारा चांगलाच तापला आहे. महिला कांग्रेस अध्यक्ष सुश्री नेट्टा डिसूज़ा, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा आणि शेतकरी नेते हिम्मत सिंह गुर्जर यांनी सतीश पुनिया यांच्यावर निशाणा साधला आहे. पुनिया यांनी हे वक्तव्य करून महिलांचा अपमान केल्याचे दोतासरा यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी सध्याच्या अर्थसंकल्पाची तुलना रंगाने काळ्या आणाऱ्या नवरीशी केली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. यावेळी बोलताना मात्र त्यांची जीभ घसरली. ''एका कृष्ण रंगाच्या वधूला ब्युटी पार्लरमध्ये नेऊन तिला चांगला मेकअप करून सादर केल्याचे दिसते'' असे महिलांविषयी वादग्रस्त विधान पुनिया यांनी केले आहे. आशा प्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतीश पुनिया यांच्या विरोधात सर्वच स्थरातून आता निषेध व्यक्त केला जात आहे.

भाजप नेत्याने महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याची ही पहिलीचं वेळ नाही..

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकवेळा महिलांवर आक्षेपार्ह टोमणे मारले आहेत. 'मुलगी वाचवा' असे भासवणाऱ्या भाजपने आणि विशेषत: त्यांच्या महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनीही सतीश पुनिया यांच्या या वक्तव्यावर मौन बाळगले आहे, यात नवल नाही. आता भाजपचे बाहुले बनलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाने अशा वक्तव्यावर प्रतिक्रिया का दिली नाही? असा प्रश उपस्थित केला जात आहे.

Updated : 24 Feb 2022 4:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top