Home > Political > एलजीबीटीक्यू' वर्गासही महिला धोरणामध्ये स्थान

एलजीबीटीक्यू' वर्गासही महिला धोरणामध्ये स्थान

एलजीबीटीक्यू वर्गासही महिला धोरणामध्ये स्थान
X

तृतीयपंथी समाजाचा घटक असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. चौथ्या महिला धोरणात एलजीबीटीक्यू (तृतीयपंथी, समलैंगिक आदी) वर्गाचाही समावेश असून बदलत्या काळानुरूप हे धोरण असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथींसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, सहसचिव श.ल.अहिरे, महिला व बालविकासचे आयुक्त राहुल मोरे, अवर सचिव महेश वरुडकर उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, राज्याच्या चौथ्या महिला धोरणासंदर्भात तृतीयपंथी यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. त्यांनी मांडलेल्या सूचनांचा अभ्यास करुन धोरणात समावेश करण्यात येईल. कुठलाही घटक यातून सुटणार नाही याची दक्षता घेतली आहे. येणाऱ्या पिढीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करायचे आहे, त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांकडून अभिप्राय व सूचना घेण्यात येत आहेत. कोविड काळात जाणवलेली आव्हानं यादृष्टीने धोरणाच्या अंमलबजावणीचा कृती आराखड्यात समावेश करण्यात येणार असल्याचे ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

Updated : 17 Feb 2022 5:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top