Home > Political > "आदित्य ठाकरेंना रस्त्यावर आणून ठार मारू..." किशोरी पेडणेकरांना पत्र

"आदित्य ठाकरेंना रस्त्यावर आणून ठार मारू..." किशोरी पेडणेकरांना पत्र

आदित्य ठाकरेंना रस्त्यावर आणून ठार मारू... किशोरी पेडणेकरांना पत्र
X

शिवसेनेच्या नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या मारण्याच्या धमकीचे पत्र देण्यात आले आहे. जितेंद्र म्हात्रे या व्यक्तीने हे पत्र किशोरी पेडणेकर यांना पाठवले आहे. हस्ताक्षरात लिहिलेल्या या पत्रात त्या व्यक्तीने उडण मधून हे पत्र पाठवत असल्याचे म्हणत किशोरी पेडणेकर यांना अत्यंत गलिच्छ भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सरकार पडू देप्रकार पडू दे आणि उद्धव ठाकरे ला सांग आमच्या अजित पवारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात. ल** जास्त माज करू नकोस अजित दादा यांनीच सांगितला आहे सरकार पडुडे. आदित्य ठाकरेंना रस्त्यावर आणून मारू ठार मारू असं म्हणत या पत्रातून किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अत्यंत अश्लील भाषा वापरण्यात आली आहे.





मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महा विकास आघाडी सरकार पडणार असल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकरणात काल भाजप देखील आता सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल भगतसिंग दोषारी यांच्या झालेल्या भेटीनंतर आज सकाळी राज्यपालांनी चे बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहे. राज्याच्या राजकारणात या सर्व घडामोडी घडत असताना. आज मुंबईच्या माझी महापौर किशोरी पेडणेकर यांना हे धमकीच पत्र मिळाले आहे. हे पत्र रायगड जिल्ह्यातील अरुण या ठिकाणाहून पाठवत असल्याचं पत्र लिहिणाऱ्या जितेंद्र म्हात्रे यांनी या पत्रात म्हटले आहे. हे पत्र लेखी हस्ताक्षरात लिहिलेला असून या पत्रात अत्यंत अर्वाच्य भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे..





Updated : 29 Jun 2022 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top