Home > Political > " रस्त्यावर आणून तुझा फो**.." शिवसेना नेत्याला अर्वाच्य भाषेत जीवे मारण्याची धमकी..

" रस्त्यावर आणून तुझा फो**.." शिवसेना नेत्याला अर्वाच्य भाषेत जीवे मारण्याची धमकी..

 रस्त्यावर आणून तुझा फो**..  शिवसेना नेत्याला अर्वाच्य भाषेत जीवे मारण्याची धमकी..
X

शिवसेनेच्या नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र देण्यात आले आहे. जितेंद्र म्हात्रे या व्यक्तीने हे पत्र किशोरी पेडणेकर यांना पाठवले आहे. हस्ताक्षरात लिहिलेल्या या पत्रात त्या व्यक्तीने उरूण मधून हे पत्र पाठवत असल्याचे म्हणत किशोरी पेडणेकर यांना अत्यंत गलिच्छ भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'सरकार पडू दे आणि उद्धव ठाकरे ला सांग आमच्या अजित पवारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात. ल** जास्त माज करू नकोस अजित दादा यांनीच सांगितले आहे सरकार पडुडे. आदित्य ठाकरेंना रस्त्यावर आणून मारू ठार मारू'' असं म्हणत या पत्रातून किशोरी पेडणेकर व आदित्य ठाकरेंना सुद्धा धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अत्यंत अश्लील भाषा वापरण्यात आली आहे.

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकरणात काल भाजप देखील आता सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या झालेल्या भेटीनंतर आज सकाळी राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहे. राज्याच्या राजकारणात या सर्व घडामोडी घडत असताना. आज मुंबईच्या माझी महापौर किशोरी पेडणेकर यांना हे धमकीच पत्र मिळाले आहे. हे पत्र रायगड जिल्ह्यातील उरूण या ठिकाणाहून पाठवत असल्याचं पत्र लिहिणाऱ्या जितेंद्र म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र लेखी हस्ताक्षरात लिहिलेले असून या पत्रात अत्यंत अर्वाच्य भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे..





Updated : 29 Jun 2022 6:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top