Home > Political > `शिंदे` गटाच्या रडारवर आता कोण?

`शिंदे` गटाच्या रडारवर आता कोण?

`शिंदे` गटाच्या रडारवर आता कोण?
X

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली. तसेच भाजपसोबत येत नवीन सरकार स्थापन केले. तर विधानसभा अध्यक्षपद आणि विश्वासदर्शक ठरावाच्या निवडणुकीतही त्यांनी १६४ संख्याबळ जमवून दाखवत बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर आता विधान परिषदेतही भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) तर उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आहेत. रामराजे यांच्या सदस्यत्वाचा कालावधी ७ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे सभापतिपदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर नीलम गोऱ्हे यांच्यावर सरकारकडून अविश्वासदर्शक ठराव आणला जाऊ शकतो. नीलम गोऱ्हे वारंवार ठाकरे सरकारच्या प्रवक्त्यांच्या भुमिकेत होत्या. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गोऱ्हे यांच्यात सभागृहातच यावरून अनेकदा वाद पेटल्याचे दिसले आहे.

विधानपरीषदेत अध्यपद आणि विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानपरीषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेतील संख्याबळ पाहता भाजपकडे सध्या पुरेसं संख्याबळ नाही. भाजपचे सध्या वरिष्ठ सभागृहात २४ सदस्य आहेत. तर शिवसेनेचे ११, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. तर एकूण १६ जागा रिक्त असून त्यापैकी १२ जागा या राज्यपाल नियुक्त आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून १२ जणांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र अद्यापही राज्यपालांनी यादीला परवानगी दिली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार लवकरच शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नवी यादी दिली जाणार आहे. यामधे चार जागा शिंदे गटाला मिळणार उर्वरीत ८ जागांवर भाजपाचा दावा आहे.

आता भाजपसोबत शिंदे गटाने नवीन सरकार स्थापन केल्याने त्यांच्याकडून नवी यादी राज्यपाल मंजूर करतील. राज्यपालांनी ही यादी अंतिम केल्यास भाजप व शिंदे गट विधान परिषदेतही बहुमताचा आकडा पार करेल. त्यामुळे महाविकाडीला त्याचा मोठा फटका बसणार आहे.

विधानपरीषदेत शिवसेना पक्षातील किती आमदार शिंदेगटाकडे जाणार यावर विधानपरीषदचे गणित अवलंबून आहे. विधानपरीषद सभापतीपदी रामराजे निंबाळकरांना कायम ठेवत उपसभापतील अविश्वास ठराव आणुन नीलम गोऱ्हे यांना हटवण्यात येणार आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे नियुक्त होऊ शकतात असे सध्याचे चित्र आहे.

विधान परिषदेतील पक्षानुसार संख्याबळ खालीलप्रमाणे :

भाजप – २४

शिवसेना – ११

राष्ट्रवादी काँग्रेस – १०

काँग्रेस – १०

राष्ट्रीय समाज पक्ष – १

लोकभारती – १

पीझंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया – १

अपक्ष – ४

रिक्त – १६

एकूण –७८

Updated : 5 July 2022 3:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top