Home > Political > Land for job case प्रकरणात लालू प्रसाद यादव व कुटुंबियांना मोठा दिलासा..

Land for job case प्रकरणात लालू प्रसाद यादव व कुटुंबियांना मोठा दिलासा..

Land for job case प्रकरणात लालू प्रसाद यादव व कुटुंबियांना मोठा दिलासा..
X

रेल्वेत नोकरीसाठी जमीन देण्याच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव, पत्नी राबडी देवी (Rabri Devi) आणि मुलगी मिसा भारती (Misra Bharti) यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने तिघांनाही ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २९ मार्च रोजी होणार आहे.

लालूंना व्हीलचेअरवर घेऊन पत्नी राबडी देवी आणि मुलगी राज्यसभा खासदार मीसा भारती कोर्टात पोहोचल्या. यादरम्यान त्यांनी मीडियाला कोणतेही प्रतिकिया दिली नाही. 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने लालूंची पत्नी राबडी देवी, मुलगी मीसा भारती यांच्यासह अन्य 14 आरोपींना समन्स बजावले होते.

समन्स जारी होण्यापूर्वी सीबीआयने लालूंची दिल्लीत आणि राबडी यांची पाटण्यात चौकशी केली. या प्रकरणी सीबीआयने ५ महिन्यांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते.

2004 ते 2009 या काळात रेल्वे मंत्री असताना लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रेल्वेत नोकरीच्या बदल्यात लोकांकडून जमिनी घेतल्याचा आरोप आहे. ही जमीन लालू कुटुंबाला भेट म्हणून देण्यात आली किंवा कमी किमतीत विकली गेली. सीबीआयचा आरोप आहे की, रेल्वेच्या ग्रुप-डी भरतीमध्ये नियम धाब्यावर बसवून नियुक्त्या करण्यात आल्या...

Updated : 15 March 2023 6:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top