Home > Political > मतांची झोळी घेऊन फिरणारे भाजपचे मंत्री सत्ता हातात येताच मुजोर झालेत : रूपाली चाकणकर

मतांची झोळी घेऊन फिरणारे भाजपचे मंत्री सत्ता हातात येताच मुजोर झालेत : रूपाली चाकणकर

मतांची झोळी घेऊन फिरणारे भाजपचे मंत्री सत्ता हातात येताच मुजोर झालेत : रूपाली चाकणकर
X

लखीमपूर या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या हिंसाचारात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांनी भाजपवर 'मतांची झोळी घेऊन फिरणारे भाजपचे मंत्री सत्ता हातात मिळाल्यावर मुजोर झाली' आशा शब्दात टीका केली आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या जिल्ह्यातील टोकोनिया येथे शेतकरी आंदोलना दरम्यान रविवारी हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये आठ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण भारतभर निषेध करण्यात येत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने सुद्धा आज भारतभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

काल घडलेल्या घटनेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निषेध व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत 'शेतकऱ्यांच्या भल्याचा उद्देश दाखवून मतांची झोळी घेऊन फिरणारे भाजपचे मंत्री सत्ता हातात मिळाल्यावर मुजोर झाली. शांततेच्या मार्गाने लखीमपुर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडण्यात आले ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. शहीद शेतकरी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली' अस म्हटलं आहे.


Updated : 2021-10-04T10:56:15+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top