Home > Political > कोल्हापूरला पहिल्या महिला आमदार मिळणार का? कोण मारणार बाजी?

कोल्हापूरला पहिल्या महिला आमदार मिळणार का? कोण मारणार बाजी?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोल्हापूरला पहिल्या महिला आमदार मिळणार का? कोण मारणार बाजी?
X

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. महाविकासआघाडीने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.

या पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी मतदान झाले होते. यावेळी 61.19 टक्के इतके मतदान झाले आहे. तर या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 15 उमेदवार आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार आज कोणाला कौल देणार याकडे कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 91 हजार 798 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 768 पुरुष व 1 लाख 46 हजार 068 महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी 12 व सैन्यदलात 95 इतके मतदार आहेत. या मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापैकी 64.49% पुरुषांनी तर एकूण महिलांच्या मतदानापैकी 57.89 टक्के महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

कोण 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

'हे' 15 उमेदवार होते रिंगणात :

जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस, चिन्ह - हात)

सत्यजित उर्फ नाना कदम (भाजपा, चिन्ह - कमळ)

यशवंत शेळके (चिन्ह - कप बशी)

विजय केसरकर (चिन्ह - ऑटो रिक्षा)

शाहीद शेख (चिन्ह - गॅस सिलेंडर)

सुभाष देसाई (चिन्ह - सोड रोलर)

बाजीराव नाईक (चिन्ह - एअर कंडिशनर)

भारत भोसले (चिन्ह - कपाट)

मनीषा कारंडे (चिन्ह - दूरदर्शन)

अरविंद माने (चिन्ह - कॅरम बोर्ड)

अजीज मुस्ताक (चिन्ह - हेलिकॉप्टर)

करुणा मुंडे (चिन्ह - शिवण यंत्र)

राजेश नाईक (चिन्ह - किटली)

राजेश कांबळे (चिन्ह - शिट्टी)

संजय मागाडे (चिन्ह - सफरचंद)

Updated : 16 April 2022 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top