Home > Political > किशोरी पेडणेकर उतरल्या मैदानात..

किशोरी पेडणेकर उतरल्या मैदानात..

येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. सध्या या निवडणुकांची सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. शिवसेना देखील मुंबई महानगरपालिकेसाठी जोरदार तयारीला लागली आहे.

किशोरी पेडणेकर उतरल्या मैदानात..
X

मुंबईच्या काळजीवाहू महापौर किशोरी पेडणेकर ह्या लोकांमध्ये वावरताना आपल्याला कायम दिसत असतात. काही धार्मिक कार्यक्रम असतील किंवा सण-समारंभात अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात त्या सहभागी होतात. नुसत्याच सहभागी होतं नाहीत तर त्या गोष्टी त्या अगदी चालीतरीती नुसार अगदी आनंदाने साजरा करतात. या सगळ्यांचे फोटो त्या आवर्जून सोशल मीडियावर देखील टाकतात.अशाचं एका कार्यक्रमाचे फोटो त्यांनी काल समाजमाध्यमांवर टाकले. मात्र काल त्यांनी जे फोटो सोशल मीडियावर शेअर केला ते इतर वेळी पेक्षा काही वेगळे होते. त्या काल थोड्या वेगळ्याच अंदाजात दिसल्या. काय आहे हा फोटो? तर किशोरी पेडणेकर चक्क क्रिकेटच्या मैदानात बॅट घेऊन फलंदाजी करायला उतरल्या आहेत. त्यांनी जे फोटो शेअर केले आहे त्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता हेच लक्षात येतं की, त्या आलेल्या प्रत्येक चेंडूला षटकांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
युवा सेना वरळी तर्फ 20-20 क्रिकेट वुमन चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते आणि याच वेळी किशोरी पेडणेकर या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या.
येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. सध्या या निवडणुकांची सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. शिवसेना देखील मुंबई महानगरपालिकेसाठी जोरदार तयारीला लागली आहे.

Updated : 27 March 2022 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top