Home > Political > Kishori Pednekar: किरीट सोमय्या हे महाभारतातीन शिखंडी…

Kishori Pednekar: किरीट सोमय्या हे महाभारतातीन शिखंडी…

Kishori Pednekar:  किरीट सोमय्या हे महाभारतातीन शिखंडी…
X

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.

"आपण थोडं मागे गेलो तर महाभारतात कौरवांच्या बाजूने शिखंडी होत्या. त्यांच्या अडून सगळे लढाई करत होते. तसंच किरीट सोमय्या हे शिखंडीची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे अशा लोकांना किती मनावर घ्यावं? किंवा त्यांच्याकडे किती लक्षं द्यावं हा प्रश्नच आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केला म्हणजे, मी आरोपी होत नाही. कारण आरोप करणं सोपं आहे, पण ते सिद्ध करावेत. बऱ्याचदा फ्रॉड हा शब्द उच्चारला नाही, केवळ किरीट सोमय्या म्हटलं तरी फ्रॉड असं म्हणायचं आहे हे कळंत.'

अशी खोचक प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे.


Updated : 13 Nov 2020 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top