Home > Political > ''लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण'' किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोल

''लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण'' किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोल

'लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण' त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ. सध्या त्यांना टीका करण्यासाठी भरपूर रिकामा वेळ मिळतो असं म्हणत किशोरी पेडणेकर यांचा राज ठाकरेंना टोला..

लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोल
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. पण राज ठाकरे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गेले नाहीत. यावरून मुंबईच्या काळजीवाहू महापौर किशोरी पेडणेकर यांनी "लोका सांगे भ्रम ज्ञान बाकी सगळे कोरडे पाषाण" अस म्हणत राज ठाकरे यांना टोला लागवला. तर दुरीकडे नालेसफाईवरून भाजप करत असलेल्या टीकेला देखील देखील उत्तर दिले आहे.

नालेसफाईवरून भाजप करत असलेल्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे उत्तर..

विरोधकांकडे दुसरं शास्त्रच नाही. टीका करणं हेच त्यांचे शास्त्र आहे. त्यांना टीका करत राहूदे स्वतः मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे व आघाडीचे आमदार हे सर्वजण मुंबईत पाणी तुंबणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. इतक्या आधी कधीच नालेसफाई होत नाही. नालेसफाईच्या प्रत्येक 6 महिन्यानंतर केली जाते. आयुक्तांनी या संदर्भात भरारी पथक देखील नेमले आहे. स्वतः आयुक्त चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही आणि तुंबले तर जास्त वेळ राहणार नसल्याचं म्हणत त्यांनी त्यांच्यावर सातत्याने विरोधक नालेसफाई वरून करत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांना लगावला टोला..

आंबेडकर जयंती जोरात साजरी झाली पाहिजे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केलं होतं. मात्र चैत्यभूमीके मनसेचे कोणही फिरकले नाही असा प्रश्न जेव्हा किशोर पेडणेकर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावेळी त्यांनी "लोका सांगे भ्रम ज्ञान, बाकी सगळे कोरडे पाषाण" असं म्हणत राज ठाकरे यांना टोला लगावला..

राज ठाकरे यांना टीका करण्यासाठी भरपूर रिकामा वेळ..

लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ. सध्या त्यांना टीका करण्यासाठी भरपूर रिकामा वेळ मिळतो. करत राहा..आम्ही केलेले काम घेऊन, कामे करूण दाखवून लोकांपर्यंत जाऊ असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Updated : 2022-04-15T13:52:28+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top