Home > Political > "८ वर्षांची असताना वडिलांनीच केले शोषण : भाजप नेत्या खुशबू सुंदर "

"८ वर्षांची असताना वडिलांनीच केले शोषण : भाजप नेत्या खुशबू सुंदर "

८ वर्षांची असताना वडिलांनीच केले शोषण : भाजप नेत्या खुशबू सुंदर
X

दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदरने नुकतेच तिच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.एक महिला म्हणून त्या नेहमीच स्वतःच्या क्षेत्रात कार्यरत आहेत . पण अनेकदा राजकीय वर्तुळात महिला वैयक्तिक आयुष्याबद्दल इतक्या स्पष्ट बोलत नाहीत . पण नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी आपल्या वडिलांविषयी खुलासा केला आहे. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत .

कोण आहेत खुशबू सुंदर ?


खुशबू हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. द बर्निंग ट्रेन (1980) या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अनेक तेलगू, कन्नड, मल्याळम चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. नुकतीच त्यांची महिला आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.

नक्की काय घडलं होतं खुशबू सुंदर यांच्यासोबत ?

अभिनेत्री भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या खुशबू सुंदरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, 'मला वाटतं जेव्हा एखादी चुकीची वागणूक दिली जाते तेव्हा ती मुलाला आयुष्यभर घाबरवते आणि ती मुलगी असो की मुलगा, काही फरक पडत नाही.अभिनेत्री पुढे म्हणाली की,जेव्हा ती फक्त 8 वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिचे शारीरिक आणि लैंगिक शोषण केले. 'आईने ते वातावरण पाहिले होते जिथे काहीही झाले तरी 'माझा नवरा माझा देव आहे' असा विचार मनात असायचा. त्यामुळेच तिला भीती वाटत होती की तिची आई तिच्यावर विश्वास ठेवेल की नाही. पण वयाच्या 15 व्या वर्षी अत्याचार इतका वाढला की तिने आवाज उठवायला सुरुवात केली.त्यावेळी ती 16 वर्षांचीही नव्हती "खुशबू सुंदर पुढे म्हणाल्या कि ,"आमच्याकडे काहीच नव्हते आणि आमच्या वडिलांनी आम्हाला सोडून दिले. अन्न कुठून येईल हेही माहीत नव्हते. माझे बालपण कठीण होते. पण सर्व अडचणींचा मी धैर्याने सामना केला"

खुशबू सुंदर आणि राजकारण

खुशबू सुंदर यांनी 2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी द्रमुकमधून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2014 पर्यंत त्या द्रमुकमध्ये राहिल्या. 2014 मध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2020 मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रभावाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे .

Updated : 6 March 2023 7:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top