Home > Political > बीड मध्ये ज्योती मेटेंच्या हस्ते मातांना साडी चोळी वाटप

बीड मध्ये ज्योती मेटेंच्या हस्ते मातांना साडी चोळी वाटप

बीड मध्ये ज्योती मेटेंच्या हस्ते मातांना साडी चोळी वाटप
X

बीड हा जिल्हा नेहमीच गर्भपाताविषयी चर्चेत असतो . बीडमध्ये गर्भपाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी नेहमी प्रयत्न होतात. नुकतंच जिजाऊ जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात नवजात बालिका आणि मातेला साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला आहे .

बीडच्या जिल्हा रुग्णालयात जिजाऊ जयंतीचे अवचित्य साधून कैलासवासी अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे . यावेळी दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आमदार विनायक मेटे यांनी सुरु केलेल्या अजित बालिका सुरक्षा योजनेची आठवण करून दिली. ज्योती मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात हा उपक्रम पार पडला आहे. यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांनी नवजात बालिकेच्या मातेचा सन्मान केला.

Updated : 12 Jan 2023 1:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top