- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

एकनाथ शिंदेंच्या मुलानेच कोसळणाऱ्या शिवसैनिकांना न्याय द्यावा, शिवसेना नेत्याचे ट्विट
X
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आले आहे. 40 पेक्षा अधिक आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदे गटाची की उद्धव ठाकरेंची? अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेमध्ये पडलेल्या या फुटीनंतर शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे व श्रीकांत शिंदे यांनी ही जबाबदारी घेऊन कोसळणाऱ्या शिवसैनिकांना न्याय द्यावा असे म्हटले आहे.
या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. मंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या 34 आमदारांचे राज्यपालांना पत्र दिले. यामध्ये मीच पक्षाचा गटनेते असल्याचं म्हणत त्यांनी प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नेमणूक केली. राज्याच्या राजकारणात अशी नाट्यपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार राहणार का? याची चर्चा सुरू आहे महा विकास आघाडीतील पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सुद्धा गोठ्यात आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आता शिवसेनेचे नक्की काय होणार असा प्रश्न असताना. दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, शिवसैनिक कष्ट करतो आणि घरदार सांभाळून शिवसेना पक्ष वाढवतो. त्याला ना सत्तेचा लोभ, ना पैशाचा तो फक्त शिवसेनेचा पाईक आहे. माननीय आदित्य साहेब ठाकरे व श्रिकांत शिंदे साहेब यांनी हि जबाबदारी घेऊन कोसळणार्या शिवसैनिकांना न्याय द्यावा. जय महाराष्ट्र!
शिवसैनिक कष्ट करतो आणि घरदार सांभाळून शिवसेना पक्ष वाढवतो. त्याला ना सत्तेचा लोभ, ना पैशाचा तो फक्त शिवसेनेचा पाईक आहे. माननीय आदित्य साहेब ठाकरे व श्रिकांत शिंदे साहेब यांनी हि जबाबदारी घेऊन कोसळणार्या शिवसैनिकांना न्याय द्यावा. जय महाराष्ट्र! @AUThackeray @DrSEShinde
— Deepali Sayed (@deepalisayed) June 24, 2022