Home > Political > अमेरिकेच्या आरोग्य सहसचिव पदी जो बायडन यांनी केली एका तृतीय पंथ्याची नेमणूक!

अमेरिकेच्या आरोग्य सहसचिव पदी जो बायडन यांनी केली एका तृतीय पंथ्याची नेमणूक!

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या मंत्री मंडळाचा समतोल अगदी अचूक राखायचा प्रयत्न केला आहे. जो बायडन यांच्या मंत्री मंडळात सर्वांना समान संधी देण्यात आली आहे.

अमेरिकेच्या आरोग्य सहसचिव पदी जो बायडन यांनी केली एका तृतीय पंथ्याची नेमणूक!
X

बालरोगतज्ञ आणि पेनसिल्व्हेनियाच्या माजी फिजिशियन जनरल, डॉ. रेचल लेव्हिन यांना जो बायडन यांनी अमेरिकेच्या आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिव पदी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. रेचल लेव्हिन यांनी हावर्ड आणि तुलेन मेडिकल स्कूल मधून मेडिकलची पदवी घेतली आहे. लेव्हिन या असोसिएशन ऑफ स्टेट ऍन्ड टेरिटोरियल हेल्थ ऑफिशीयलच्या अध्यक्षा आहेत.

डॉ. रेचल लेव्हिन यांना पहिल्यांदा २०१७ मध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या टॉम वुल्फ सरकारने सध्याच्या पदावर नियुक्त केले होते. डॉ. रेचल लेव्हिन या अमेरिकेतील काही मोजक्या तृतीय पंथ्यांपैकी एक आहेत, ज्या सरकारने नियुक्त केलेल्या किंवा लोकांनी निवडून दिलेल्या आहेत, आणि ज्या राष्ट्रीय पातळीवर सरकारच्या वतीने काम करतात.

डॉ. रेचल लेव्हिन यांच्या नियुक्तीमुळे अमेरिकेतील लोकांचा तृतीय पंथ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. तसेच रेचल या स्वतः डॉक्टर असल्यामुळे अमेरिकेला कोरोना माहामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची मदत होईल. त्याच बरोबर डॉ. रेचल या स्वतः कल्पक असल्याने त्या अमेरिकेचा सर्वदूर विकासच करतील असं मत अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या संसदीय इतिहासात जो बायडन यांच्या मंत्री मंडळात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडताना दिसणार आहेत. येत्या गुरूवारी २१ जानेवारी २०२० रोजी जो बायडन आणि त्यांचे सहकारी व्हाईट हाऊसचा कारभार स्वीकारणार आहेत.

Updated : 20 Jan 2021 2:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top