Home > Political > हे तीन बडे नेते जेलमध्ये जाणार, ॲड. जयश्री पाटील यांची भविष्यवाणी

हे तीन बडे नेते जेलमध्ये जाणार, ॲड. जयश्री पाटील यांची भविष्यवाणी

हे तीन बडे नेते जेलमध्ये जाणार, ॲड. जयश्री पाटील यांची भविष्यवाणी
X

ॲड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलीसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठवलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर संतापलेल्या ॲड जयश्री पाटील यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या विरोधातलं मोठं प्रकरण बाहेर काढल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं. तीन मोठी लोकं जेल मध्ये जातील, चौकशी सुरू आहे असं म्हणत जयश्री पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.

मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारातच जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नावं घेऊन ओरडायला सुरुवात केली. आपल्या तक्रारीनंतर ६०० कोटी रूपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, आणि लवकरच तीन लोकं जेल मध्ये असतील असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं.

ॲड जयश्री पाटील या गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील केस ही त्यांनी केली होती.

हे ही वाचा...

अजित पवार आणि पंकजा मुंडेंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध...


"मी आणि गणेश नाईक लिव्ह इनमध्ये राहत होतो", महिलेची महिला आयोगाकडे तक्रार


#covid19 ; महाराष्ट्रासह पाच राज्यांना सतर्कता वाढवण्याच्या सूचना..

Updated : 2022-04-09T18:38:36+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top