Home > Political > #sanjay raut : जया बच्चन म्हणाल्या"फक्त ११ लाखांसाठी तुम्ही..."

#sanjay raut : जया बच्चन म्हणाल्या"फक्त ११ लाखांसाठी तुम्ही..."

#sanjay raut : जया बच्चन म्हणाल्याफक्त ११ लाखांसाठी तुम्ही...
X

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने ताब्यात घेतले. दिवसभराच्या विचारपूस केल्यानंतर रात्री उशीरा त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. याप्रकरणी त्यांना तीन दिवसांची म्हणजेच ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. यावर अनेक राजकीय नेत्यानी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रीया दिल्या आहेत. दरम्यान याविषयी अभिनेत्री, खासदार जया बच्चन यांनी त्यांच मत व्यक्त केलं आहे.

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी राऊत यांना ईडी अटक केली आहे. संजय राऊतांना ई़डीने अटक केल्यानंतर विविध स्तरावरुन यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नुकतंच याप्रकरणी खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी बोलताना जया बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर आरोप केले.

जया बच्चन यांनी संजय राऊत यांना ईडीने अटक केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली.. संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यात ईडीचा गैरवापर झाला, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न जया बच्चन यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, नक्कीच. आमचा संजय राऊतांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. सध्या ईडीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फक्त ११ लाख रुपयांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात. यापुढे त्यांना संजय राऊतांच्या आईबद्दल विचारण्यात आले. राऊत यांची आई खूप म्हातारी आहे. त्यावर त्यांनी.. हो मला माहिती आहे असे म्हटले. यापुढे त्यांना ईडीचा हा अशाप्रकारे सुरु असलेला अवाजवी वापर आणखी किती दिवस चालेल असे तुम्हाला वाटते ? असे विचारण्यात आले. त्यावर जया बच्चन यांनी "२०२४ पर्यंत" एकंदरी २०२४ पर्यंत भाजपाची सत्ता केंद्रात आहे. तो पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चन यांनी दिली.

Updated : 2 Aug 2022 5:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top