Home > Political > ''हा एक सन्मान होता..'' अमृता फडणवीस यांचे नवे ट्विट

''हा एक सन्मान होता..'' अमृता फडणवीस यांचे नवे ट्विट

हा एक सन्मान होता.. अमृता फडणवीस यांचे नवे ट्विट
X

मिड डे इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड मध्ये सिने कलाकारांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित केलं जातं . यावर्षीचा हा सोहळा दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम २८ जूनला दुबई शहरात पार पडला . या सोहळ्याचे विशेष अतिथी म्हणून विवेक ओबेरॉय आणि अमृता फडणवीस उपस्थित होते . तसेच या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर, परिणीती चोप्रा, ईशा कोपीकर, पूजा चोप्रा, ईशा गुप्ता, निहारिका रायजादा आणि राखी सावंत यांना सन्मानित करण्यात आले.नुकतंच, लंडनमध्ये अमृता फडणवीस यांना 'इंडियन ऑफ द वर्ल्ड' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं आहे .

त्याचबरोबर मिड डे इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून मान मिळाल्याबद्दल अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे . "दुबई येथील मिड डे आंतरराष्ट्रीय शोबिझ आयकॉन्स मद्ये पुरस्कारांचे उद्घाटन करणे आणि प्रदान करणे हा एक सन्मान होता तसेच प्रसारमाध्यमे आणि करमणूक माध्यम हे एका स्पंजसारखे आहेत जे समाजाच्या मनातील उलथापालथ, विचार आणि कृती आत्मसात करते आणि समाजात नवीन मूल्ये रुजवण्यासाठी योग्य पार्श्वभूमी तयार करते" असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

Updated : 2 July 2022 2:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top