Home > Political > लाज वाटते गोव्यातील भाजप सरकारची, अलका लांबा यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

लाज वाटते गोव्यातील भाजप सरकारची, अलका लांबा यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

लाज वाटते गोव्यातील भाजप सरकारची, अलका लांबा यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका
X

पणजीपासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेनॉलिम (Benolim) बिचवर फिरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना गोव्यात समोर आली आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर टीका होत असून, विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बलात्कार झालेल्या मुली रात्रीच्या वेळी बीचवर का गेल्या, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत खोचक शब्दात समाचार घेतला आहे.

अलका लांबा यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत म्हंटले आहे की, लाज वाटते गोव्यातील भाजप सरकारची आणि धिक्कार आहे अशा संघी मानसिकतेच्या मुख्यमंत्र्यांचा ज्यांना मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनेला बलात्कारी नव्हे तर मुलींचे आई-वडील जवाबदार वाटतात ज्यांनी आपल्या मुलींना घराबाहेर जाण्यासाठी परवनागी दिली, अशा शब्दात अलका लांबा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली आहे.

Updated : 29 July 2021 2:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top