Home > कोरोनाच्या लढाईत परिचारिका याच देवदूत - अजित पवार

कोरोनाच्या लढाईत परिचारिका याच देवदूत - अजित पवार

कोरोनाच्या लढाईत परिचारिका याच देवदूत - अजित पवार
X

'जागतिक परिचारिका दिना'च्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, एक पाऊल पुढे जाऊन जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या 'परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल.” अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा...

“मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचं स्थान सर्वोच्च आहे. जगभरातल्या परिचारिकांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेची अखंड सेवा केली आहे. परिचारक बंधु-भगिनींना समाजात स्नेहाचं... आदराचं स्थान लाभत आलं आहे. आज जगावर कोरोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका भगिनी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. उपचारांच्या बरोबरीने रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत. स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपूरे आहेत.” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय.

“करोनावर सध्यातरी कोणतेही हमखास औषध नसल्यानं रुग्णांची योग्य काळजी आणि शुश्रूषा हीच आरोग्य संजीवनी ठरत आहे. हे काम परिचारिका भगिनी अत्यंत सेवाभावानं, तन्मयतेने करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांचं करोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत समस्त परिचारकांचं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही,” असंही ते म्हणाले.

Updated : 12 May 2020 1:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top