Home > Political > उत्तर प्रदेश सरकारकडे दुसरं काम नाहीये का? मुलांच्या Instagram हॅक वरून प्रियंका गांधी भडकल्या

उत्तर प्रदेश सरकारकडे दुसरं काम नाहीये का? मुलांच्या Instagram हॅक वरून प्रियंका गांधी भडकल्या

प्रियंका गांधी यांच्या मुलांचं Instagram अकाउंट वारंवार हॅक होत असल्याने त्या चांगल्याच संतप्त झाल्या आहेत.उत्तर प्रदेश सरकारकडे दुसरं काम नाहीये का? असा संतप्त सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारकडे दुसरं काम नाहीये का? मुलांच्या  Instagram हॅक वरून प्रियंका गांधी भडकल्या
X

नवी दिल्ली// काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उत्तर प्रदेश सरकारवर चांगल्याच भडकल्यात. प्रियंका गांधी यांच्या मुलांचं Instagram अकाउंट वारंवार हॅक होत असल्याने त्या चांगल्याच संतप्त झाल्या आहेत, याबाबत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, माझ्या मुलांचं Instagram अकाउंट हॅक केलं जात आहे. उत्तर प्रदेश सरकारकडे दुसरं काम नाहीये का? असा संतप्त सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या फोन टॅपिंगचा मुद्दा गाजत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे उत्तर प्रदेशमध्ये फोन टॅप केले जात आहेत. आणि स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपले फोनवरील संभाषण ऐकत असल्याचा गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यातच प्रियंका गांधी यांनी हा नवा आरोप केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने राज्याचा विकास करावा, लोकांच्या समस्या सोडवाव्यात, अत्याचार करणाऱ्यांना रोखावं या सर्व गोष्टी न करता फोन टॅपिंग, इन्स्टाग्राम हॅक करणे यातच सरकार व्यस्त आहे असा घणाघात गांधी यांनी केला आहे. सोबतच प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयागाज येथील कार्यक्रमावरही टीका केली. पंतप्रधान मोदी महिला सशक्तीकरण संमेलनात सहभागी झाले होते. मी मुलगी आहे. लढू शकते म्हणूनच मोदींना आज महिलांची दखल घ्यावी लागली. या देशातील महिला शक्तीसमोर मोदी झुकले आहेत. असं त्या म्हणाल्या.

Updated : 2021-12-22T08:56:24+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top