Home > Political > अजित पवारांच्या बहिणीच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

अजित पवारांच्या बहिणीच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

अजित पवारांच्या बहिणीच्या घरी आयकर विभागाची छापेमारी
X

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या कोल्हापुरातील एका व पुण्यातील दोन बहिणींवर देखील धाडी टाकल्या आहेत. या तिन्ही बहिणीच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे छापे टाकले आहेत.

या सगळ्या घडामोडीवर बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'माझ्याशी संबंधित कारखान्यावर धाडी टाकल्या त्या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही. मी सुद्धा एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचे दुःख आहे. माझ्या बहिणींची पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी लग्नं झाली आहेत. त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरू आहे. त्यात कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन वाहिनीवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहित नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची व मुलींची सुद्धा लग्नं झाली आहेत. त्यांना नातवंडे सुद्धा आहेत. फक्त अजित पवार यांचे नातेवाईक म्हणून धाडी टाकल्या असतील तर या सर्व संस्थांचा कोणत्या स्तरावर जाऊन वापर केला जात आहे याचा राज्यातील जनतेने याचा जरूर विचार करावा.

Updated : 7 Oct 2021 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top