नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात प्रियंका गांधींचा जय माता दी चा नारा...
Max Woman | 11 Oct 2021 4:48 AM GMT
X
X
लखीमपूर खेरी मधील घटनेनंतर उत्तर प्रदेशचं राजकारण तापलं आहे. लखीमपूर खेरी येथील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांनी काल वाराणसीमध्ये #KisanNyayRally शेतकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लखीमपूर खेरी प्रकरणात पीडित कुटुंबांना पैशाची नाही तर न्यायाची गरज आहे. पण पीडित शेतकरी कुटुंबांना उत्तरप्रदेशमध्ये न्यायाची आशा नाही. हाथरस प्रकरणातही न्याय मिळाला नाही अशा शब्दात योगी सरकारच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला.
Updated : 2021-10-11T10:19:31+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire