Home > Political > ''तो पण व्हिडिओ मी सर्वांसमोर आणणार..''

''तो पण व्हिडिओ मी सर्वांसमोर आणणार..''

तो पण व्हिडिओ मी सर्वांसमोर आणणार..
X

भाजपचे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर एका महिलेने एका व्हिडिओच्या माध्यमातून गंभीर आरोप केले. त्यानंतर आता देशमुख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळं होत असताना या प्रकरणी भाजपचे नेते रणजित निंबाळकर व आणखीन एक कार्यकर्ता देशमुख यांना मदत करत असल्याचा धक्कादायक खुलासा पीडितेने माध्यमांसमोर येत केला आहे. श्रीकांत हे माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना मी २०१९ पासून ओळखते. त्यानंतर डिसेंबर २०२१ पासून त्यांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तुझं भविष्य करेन अशी खोटी वचने दिली. मी आमदार झालो तर तू आमदार झाल्यासारखं आहे. त्यानंतर जानेवारी २०२१ नंतर आमच्यात शारीरिक संबंध आले. त्या माणसाने मला फसवले आहे. या सर्व प्रकरणात या महिलेने भाजपवर देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हंटल आहे की, हे सर्व प्रकरणी मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. त्यांना मी पात्र लिहून तक्रार केली आहे. या गोष्टीला मला राजकीय बनवायचं नव्हतं पण मला पार्टीच्या लोकांनीच डावलले व काही कार्यकर्त्यांनी मला पैसे घेऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजपचे नेते रणजित निंबाळकर व आणखीन एक कार्यकर्ता देशमुख यांना मदत करत असल्याचा धक्कादायक खुलासा या पीडित महिलेने केला आहे.

पीडितेने माध्यमांसमोर येत काय खुलासा केला आहे..

श्रीकांत हे माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना मी २०१९ पासून ओळखते. त्यानंतर डिसेंबर २०२१ पासून त्यांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तुझं भविष्य करेन अशी खोटी वचने दिली. मी आमदार झालो तर तू आमदार झाल्यासारखं आहे. त्यानंतर जानेवारी मध्ये आमच्यात शारीरिक संबंध आले. तर पीडित महिलेने श्रीकांत देशमुख यांचे व तिचे २७ Desember ला एका हॉटेल मध्ये लग्न झाले असल्याचं सांगत. या लग्नाला आम्ही दोघेच होतो हे लग्न वैदिक पद्धतीने झाले. त्यांनी माझ्याशी लग्न केलं असल्याचे माझ्याकडे पुरावे असल्याचं सुद्धा सांगितले आहे. श्रीकांत देशमुख यांनी मला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. खोट्या लग्नाचं आमिष दाखवलं. या नंतर हे प्रकरण मी माझ्या नातेवाईकांना सांगितले त्यानंतर त्यांच्या मोठ्या भावांनी येतो म्हणून काही दिवस घालवले व त्यानंतर माझ्यावरच हनीट्रॅपची केस टाकली. या लोकांनी मी काही बोलू नये म्हणून मला व आईला एका हॉटेल मध्ये २४ तासापेक्षा जास्त वेळ ट्रॅप करून ठेवलं होत. तो पण विडिओ मी सर्वांसमोर आणणार आहे. त्यावेळी पार्टी मला न्याय देईल म्हणून मी बीजेपी कार्यालयाला हि गोष्ट सांगितली होती. या सर्व प्रकरणी मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. त्यांना मी पत्र लिहून तक्रार केली आहे. या गोष्टीला मला राजकीय बनवायचं नव्हतं पण मला पार्टीच्या लोकांनीच डावलले व काही कार्यकर्त्यांनी मला पैसे घेऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजपचे नेते रणजित निंबाळकर व आणखीन एक कार्यकर्ता देशमुख यांना मदत करत असल्याचा धक्कादायक खुलासा या पीडित महिलेने केला आहे.

Updated : 20 July 2022 3:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top