Home > Political > निलेश लंके शिंदेंच्या संपर्कात?

निलेश लंके शिंदेंच्या संपर्कात?

निलेश लंके शिंदेंच्या संपर्कात?
X

विधानसभेच्या अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अनुपस्थित राहिल्याने समाजमाध्यमांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आमदार लंके हे सध्या जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. ते काही वर्षे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. त्यामुळे त्यांचे शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे निलेश लंके सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहवत व शिंदे यांना मदत करण्यासाठीच ते आले नाहीत अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती. कोरोना काळात इतक्या निडरपणे लढणारे निलेश लंके अचानक आजारी पडल्यामुळे त्यांच्या आजारपणावर आणि आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र त्यांनी आज याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्याने विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. काल ( रविवारी ) विधानसभेचे अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया झाली. या मतदान प्रक्रियेला पारनेरचे आमदार निलेश लंके अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यांनी अनुपस्थितीला आजारपणाचे कारण दिले. मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) मुंबईतील विभानसभेत दिसले. आज विश्वासदर्शक ठारावाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे आमदार लंकेच्या अनुपस्थितिवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. कालच्या अनुपस्थिति बद्दल विचारले असता

लंके म्हणाले होते, 'मी आजारी आहे माझ्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत.डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे.याबाबत मी कालच आमच्या पक्षाचे नेते जयंत पाटील साहेब यांच्याशी बोललो होतो.त्यांनी माझ्या डॉक्टरांशीही चर्चा केली . आजारपणात प्रवास करण्याजोगी स्थिती नव्हती, सलाईन सुरू होते. जर बरे वाटले तर या असा सल्ला जयंत पाटील साहेब यांनी दिला होता.जाण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून गेलो नाही.आणि निवडणूकही फार अटीतटीची नव्हती.त्यामुळे त्यांच्या परवानगीनेच अनुपस्थित होतो.जर जयंत पाटील साहेब म्हणाले असते तुला काहीही करून यावेच लागेल निवडणूक अटीतटीची आहे तर ICU मधून उठून मतदानासाठी गेलो असतो.' असे‌ लंकेंनी म्हटले होते. कोरोना काळात अखंड काम करणारे निवेश लंकेचे‌ आजारपणाबद्दल शंका उपस्थित होत होत्या.

विधानसभेत काल ( रविवारी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अनुपस्थित होते. यात आमदार नीलेश लंके यांचा समावेश होता. त्यामुळे निलेश लंके हे जाणून बुजून गेले नाहीत अशी चर्चा रंगली होती.

Updated : 4 July 2022 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top