Home > Political > बिकीनीत ट्रोल कंगनाचा साडीत जय महाराष्ट्र, उर्मिला मातोंडकर म्हणतात बाई डोक्यावर पडलेय

बिकीनीत ट्रोल कंगनाचा साडीत जय महाराष्ट्र, उर्मिला मातोंडकर म्हणतात बाई डोक्यावर पडलेय

बिकीनीत ट्रोल झाल्यानंतर कंगनाचा साडीत जय महाराष्ट्र, उर्मिला मातोंडकर म्हणतात बाई डोक्यावर पडलेय

बिकीनीत ट्रोल कंगनाचा साडीत जय महाराष्ट्र, उर्मिला मातोंडकर म्हणतात बाई डोक्यावर पडलेय
X

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती.

यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनाने हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगनाने त्यावर बोलायचे टाळले.

दरम्यान, कंगनाचं माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे कंगनाचं हेच वाक्य पकडून उर्मिला मातोंडकर यांनी "बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ.." असा टोला लगावला आहे. उर्मिला यांनी कंगनानं मुंबईबाबत केलेल्या ट्वीटवर ही प्रतिक्रिया दिली आहे.


Updated : 2020-12-29T18:00:16+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top