Home > Political > "मी पक्षातील नेत्यांशी खुल्या मनाने बोलते माझ्याशी बोलण्यासाठी..." सोनिया गांधींनी दिला पक्ष्यातील नेत्यांना समज..

"मी पक्षातील नेत्यांशी खुल्या मनाने बोलते माझ्याशी बोलण्यासाठी..." सोनिया गांधींनी दिला पक्ष्यातील नेत्यांना समज..

मी पक्षातील नेत्यांशी खुल्या मनाने बोलते माझ्याशी बोलण्यासाठी... सोनिया गांधींनी दिला पक्ष्यातील नेत्यांना समज..
X

"माझ्याशी माध्यमांद्वारे बोलण्याची गरज नाही, मी पक्षाच्या नेत्यांशी खुल्या मनाने बोलते." आशा शब्दात सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना खडसावले आहे. येत्या काळात पाच राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. याच राज्यांमधील निवडणुकांपूर्वी आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीत नवीन अध्यक्ष पदाच्या नावाची चर्चा होणार का? याबाबत स्वतः सोनिया गांधी यांनी देखील भाष्य केला आहे. आजच्या या बैठकीत आज येवू घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणूकां संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी पक्ष संघटनेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. पक्ष संघटनेच्या निवडणुका घ्यायच्या होत्या पण कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत असेही सांगितले. यावेळी त्यांनी जी-23 च्या नेत्यांना उद्देशून पूर्णवेळ आणि व्यवहारिक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट केली.

आज पार पडलेल्या या बैठकीस काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये राहुल गांधी अशोक गहलोत आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे 52 नेते यावेळी उपस्थित होते.

Updated : 2021-10-16T18:01:43+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top