Home > Political > 'दिलीप वळसे पाटील हे निष्क्रीय सरकारमधील निष्क्रीय मंत्री'' चित्रा वाघ संतापल्या

'दिलीप वळसे पाटील हे निष्क्रीय सरकारमधील निष्क्रीय मंत्री'' चित्रा वाघ संतापल्या

दिलीप वळसे पाटील हे निष्क्रीय सरकारमधील निष्क्रीय मंत्री चित्रा वाघ संतापल्या
X

राज्यात महिला अत्याचारासह गुन्हेगारीच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तर पुणे शहरात झालेल्या चिमुकल्याच्या अपहरणावरूनही चांगलेच रान पेटले होते. अखेर तो चिमुकला सुखरूप मिळाला. मात्र त्यानंतरही पुणे जिल्ह्यात महिला अत्याचाराचे प्रकार दररोज समोर येत आहेत, त्यावरून भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. सातारा जिल्ह्यात सरपंचाने वनरक्षक महिलेला मारहाण करतानाचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातही महिला अत्याचाराचे प्रकार समोर यायला सुरूवात झाली. तर पिंपरी चिंचवड, शिरूर आणि पिंपरी येथे महिला अत्याचाराचे प्रकार समोर आले आहेत. त्यावरून चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार, शिरूरमध्ये 8 नराधमांकडून महिलेवर सामुहिक बलात्कार तर पिंपरी येथे जीपमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यावरून चित्रा वाघ यांनी राज्याचे गृहमंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे निष्क्रीय सरकारमधील निष्क्रीय मंत्री ठरले आहेत. तर पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, सरकार निष्क्रीय आहे, गृहमंत्री निष्क्रीय आहेत, तर अत्याचार रोखणार कसा?

Updated : 23 Jan 2022 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top