Home > Political > हेमामालिनीच्या गालांची तूलना रस्त्यांशी केल्याप्रकरणी गुलाबराव पाटीलांची जाहीर माफी...

हेमामालिनीच्या गालांची तूलना रस्त्यांशी केल्याप्रकरणी गुलाबराव पाटीलांची जाहीर माफी...

हेमामालिनीच्या गालांची तूलना रस्त्यांशी केल्याप्रकरणी गुलाबराव पाटीलांची जाहीर माफी...
X

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणादरम्यान अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालांची तुलना रस्त्यांशी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. महिला आयोगातर्फे तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला होता. या सर्व टीका टीपण्ण्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आत माफी मागितली आहे. "भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो", असे यावेळी गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या एका प्रचार सभेत मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. आणि यावेळी त्यांनी 'तीस वर्षे आमदार असलेल्या लोकांना माझं आव्हान आहे. त्यांनी माझ्या मतदार संघात येऊन पहावं. धरणगावला हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर मी राजीनामा देईन.' असे वक्तव्य केले होते.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रीया

"गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील..शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं.गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली. गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार? शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही… मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही." अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती.

महिला आयोगाने दिले होते कारवाईचे आदेश

त्यांच्या या वक्तव्यावर राज्य महिला आयेगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही एक व्हिडीओ प्रसिध्द करत राज्य महिला आयोग महिलांचा अवमान केल्याप्रकरणी गुलाबराव पाटलांवर कारवाई करणार असल्याचं म्हणाल्या आहेत. " राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तूलना हेमा मालिनी यांच्या गालांशी करत फक्त त्यांचाच नाही तर समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. राज्य महिला आयोग त्यांच्याव योग्य ती कारवाई करेल."

Updated : 20 Dec 2021 9:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top