Top
Home > Political > मोदींवर टीका केली म्हणून गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं 'नक्षली'

मोदींवर टीका केली म्हणून गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं 'नक्षली'

कोविड मृतांची प्रेतं गंगेत टाकल्यामुळे कवयित्री पारुल खाक्कर यांनी ‘मेरा साहेब नंगा’ म्हणत इथल्या व्यवस्थेवर टीका केली होती

मोदींवर टीका केली म्हणून गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं नक्षली
X

"साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा" सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली गुजराती कवयित्री पारुल खाक्कर यांची ही कविता तुम्ही वाचलीच असेल. पण. या कवयित्रीला आता गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला 'नक्षली' ठरवलं आहे.

गुजरात साहित्य परिषदेने पारुल खाक्कर यांच्यावर अराजकता पसरवल्याचा आरोप केलाय. परिषदेने आपल्या 'शब्दसृष्टी' या नियतकालिकाच्या संपादकीयमध्ये म्हटलंय की, "या कवितेत ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करण्यात आलाय तो कवितेला शोभत नाही. अशाप्रकारची विचारसरणी केवळ केंद्र सरकारच्या विरोधी विचारसरणीत आहे. हा विचार नक्षली साहित्यिकांचा आहे."

"ही कविता नसून अराजकता पसरवण्याचा प्रकार आहे. ही कविता कोणत्याच दृष्टीकोनातून कविता नाहीये. हा केवळ विनाकामाचा आक्रोश आहे,"

पारुल खक्कर यांच्या छोट्या काव्याने गुजरातमध्ये एक वादळ निर्माण केलं. गंगा नदीत अनेक मृतदेह वाहताना पाहून देशभरात खळबळ उडाली. मृतदेहांची अशी अवस्था पाहून अनेकजण हळहळले. याच घटनेवर गुजरातच्या कवयित्री पारुल खक्कर यांनी लिहीलेली कविता देशभरात गाजली. अनेक भाषांमध्ये या कवितेचं भाषांतरही झालं.

पारुल खक्कर यांची मुळ कविता –

एक साथ सब मुर्दे बोले 'सब कुछ चंगा-चंगा'

साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा

ख़त्म हुए श्मशान तुम्हारे, ख़त्म काष्ठ की बोरी

थके हमारे कंधे सारे, आंखें रह गई कोरी

दर-दर जाकर यमदूत खेले

मौत का नाच बेढंगा

साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा

नित लगातार जलती चिताएं

राहत मांगे पलभर

नित लगातार टूटे चूड़ियां

कुटती छाती घर-घर

देख लपटों को फ़िडल बजाते वाह रे 'बिल्ला-रंगा'

साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा

साहेब तुम्हारे दिव्य वस्त्र, दैदीप्य तुम्हारी ज्योति

काश असलियत लोग समझते, हो तुम पत्थर, ना मोती

हो हिम्मत तो आके बोलो

'मेरा साहेब नंगा'

साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा

Updated : 11 Jun 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top