Home > Political > 'मदतीचा एक घास' बनेल पोटाचा आधार.. प्रणिती शिंदे लाटतायेत गरजुंसाठी चपात्या

'मदतीचा एक घास' बनेल पोटाचा आधार.. प्रणिती शिंदे लाटतायेत गरजुंसाठी चपात्या

कोरोनामुळे संपुर्ण देशात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनने लोकांच्या पोटाला देखील लॉक लागला आहे. लोकांच्या हाताचे काम गेल्याने अनेक लोक अर्धपोटी, तर काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मदतीचा एक घास  बनेल पोटाचा आधार.. प्रणिती शिंदे लाटतायेत गरजुंसाठी चपात्या
X

कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच भूकेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष मदत करताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे.

कॉंग्रेसचा 'मदतीचा एक घास' उपक्रम?

थेंबे थेंबे तळे साचे, घरच्या गृहिणी घरी रोज स्वयंपाक करत असतात, त्याच स्वयंपाकातील प्रत्येक महिला काँग्रेस कार्यकर्त्याने दहा ते बारा चपात्या अधिक करून या चपात्या गरजू लोकांना पोचवाव्यात, हा उद्देश समोर ठेऊन कॉंग्रेसने मदतीचा एक घास कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमासाठी एक केंद्र तयार करून सर्व जमलेले डब्बे गरजू लोकांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आज आमदार प्रणिती शिंदे स्वत: जेवन बनवून गरजू लोकांना देत आहेत. महिला या संवेदनशील असतात, त्यांना परिस्थिती अधिक चांगली समजून घेता येते. त्यांना सर्वांच्या पोटाची चिंता असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रणिती शिंदे, व प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा हा पहिला दिवस असून आज प्रणिती शिंदे यांनी स्वत: स्वयंपाक करत गरजूंना पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी जनतेला आवाहन करताना 'या माध्यमातून गरजू लोकांना पोटभर जेवण मिळेल आणि राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा घडून येईल त्यामुळं आपण सर्वांनी देखील या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.

Updated : 12 May 2021 6:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top