Top
Home > Political > ग्रामपंचायत निवडणूक निकाल : सुनेने केला सासूचा पराभव

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : सुनेने केला सासूचा पराभव

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : सुनेने केला सासूचा पराभव
X

औरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत काही मजेशीर लढत पाहायला मिळाला होत्या, ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात चक्क सासू विरोधात सुनेने तर जावई विरोधात सासऱ्याने निवडणुकीत उडी घेतली होती.

धोंधलगावात गावात शिवशाही विरोधात छत्रपती ग्रामविकास पॅनलमध्ये थेट लढत झाली होती. ज्यात शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि जावई लक्ष्मण काळे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे आणि सासरे रावसाहेब वैद्य एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे सासूच्या विरोधात सूनेनं आणि सासऱ्याच्या विरोधात जावयानं निवडून येण्याचा दावा केला होता.

मात्र काहीवेळापूर्वी आलेल्या निकालानुसार सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे. मात्र जय-पराजय विसरून आता पुन्हा नेहमीप्रमाणे आपलं नात कायम असणार असल्याचं चारही उमेदवारांनी बोलवून दाखवलं आहे.

Updated : 18 Jan 2021 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top