Home > Political > मध्य प्रदेशात आता कोणत्याही सरकारी कार्यक्रमाआधी मुलींचे पूजन, आदेश जारी

मध्य प्रदेशात आता कोणत्याही सरकारी कार्यक्रमाआधी मुलींचे पूजन, आदेश जारी

मध्य प्रदेशात आता कोणत्याही सरकारी कार्यक्रमाआधी मुलींचे पूजन, आदेश जारी
X

आता मध्य प्रदेश मधील सर्व सरकारी कार्यक्रमांची सुरुवात 'मुलींची पूजा' करुन होईल. याबाबतचे आदेश अधिकाऱ्यांना गुरुवारी माहिती दिली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चार महिन्यांपूर्वी हा उपक्रम जाहीर केला, जो आता राबविला जात आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १५ ऑगस्ट २०२० ला स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली होती. शिवराजसिंह चौहान यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातही सरकारमध्ये मुलींचे पूजन आणि त्यांचे पाय धुऊन कार्यक्रमांची सुरुवात केली होती होती. मात्र तेव्हा या प्रकारचा सरकारी आदेश जारी करण्यात आला नव्हता. आता सर्व सरकारी कार्यक्रमांआधी मुलींचे पूजन केले जाईल. त्यांची सुरुवात २५ डिसेंबरला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमापासून होणार आहे.

Updated : 25 Dec 2020 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top