Home > Political > "लॉकडाउनमध्ये बऱ्यापैकी रिलीफ दिला. पण, आता सक्तीने कर वसुली"

"लॉकडाउनमध्ये बऱ्यापैकी रिलीफ दिला. पण, आता सक्तीने कर वसुली"

600 कोटींचा कर जमा होणं अपेक्षीत होतं पण प्रत्यक्षात साडेतीनशे कोटींचा कर जमा झाला आहे. लॉकडाउनमध्ये बऱ्यापैकी रिलीफ दिलं पण आता काही ठिकाणी सक्तीने कर वसुली करावी लागत आहे. असही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउनमध्ये बऱ्यापैकी रिलीफ दिला. पण, आता सक्तीने कर वसुली
X

मुंबई महानगर पालिकेकडून थकबाकी असलेल्या कर वसुली संदर्भात मोठी मोहीम हाती घेतली असून या मोहीमेअंतर्गत आतापर्यंत साडेतीनशे कोटींची कर वसुली झाल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगीतलं.

"ही थकबाकी 600 कोटींची असल्याने आम्हाला काही ठिकाणी सक्तीने कर वसुली करावी लागत आहे. लॉकडाउनमध्ये आम्ही करदात्यांना बऱ्यापैकी रिलीफ दिला. पण पालीकेचे सर्व खर्च, योजनांसाठी लागणारा निधी हा याच करातून खर्च होत असतो. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही सक्तीने कर वसुली करत आहोत. या मोहीमेअंतर्गत आता पर्यंत साडेतीनशे ते चाररशे कोटींचा कर जमा झाला आहे. उर्वरीत रक्कम सुध्दा लवकरच जमा होइल." असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Updated : 17 March 2021 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top