Home > Political > संजय राठोडांबद्दलच्या विधानावरून चित्रा वाघ उदय सामंतांवर कडाडल्या

संजय राठोडांबद्दलच्या विधानावरून चित्रा वाघ उदय सामंतांवर कडाडल्या

संजय राठोडांबद्दलच्या विधानावरून चित्रा वाघ उदय सामंतांवर कडाडल्या
X

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन विभागाचा राजीनामा देणाऱ्या संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात वापसी होण्याचे संकेत शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सामंत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'एका निष्पाप मुलीच्या हत्येचं पाप डोक्यावर असणाऱ्याला म्हणे पुन्हा मंत्रीपदाचे वेध लागलेत', असा खोचक टोला वाघ यांनी लगावला आहे.

चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हंटले आहे की,'राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात वापसी होणार असल्याची प्रतिक्रिया एका मंत्र्याने दिली आहे,पण ज्यांनी ही प्रतिक्रिया दिली त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर बऱ्याच गोष्टी समोर येतील अशी टीका वाघ यांनी केली आहे. खरंतर एका निष्पाप मुलीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं पाप राठोड यांच्या माथ्यावर आहे, त्यामुळे हे सरकार बलात्काऱ्यांना आश्रय नव्हे तर राजश्रय देत असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला.उदय सामंत हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात दौरा केला. त्यानंतर त्यांना राठोडांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना,सामंत म्हणाले की, त्यांनी सूचक विधान केलं. राठोड यांची कार्यपद्धती पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता राठोड पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? अशी चर्चा रंगली आहे.

Updated : 10 July 2021 4:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top