Home > Political > वनमंत्री राठोडांचा राजीनामा, चित्रा वाघ यांच्या मागणीला यश?

वनमंत्री राठोडांचा राजीनामा, चित्रा वाघ यांच्या मागणीला यश?

वनमंत्री राठोडांचा राजीनामा, चित्रा वाघ यांच्या मागणीला यश?
X

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांचा रोष टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला आहे. राठोडांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना भेटून राजीनामा सुपुर्त केला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थोड्याच वेळात अधिकृत घोषणा करणार आहेत..

वनमंत्री संजय राठोड हे पत्नी शीतल राठोड आणि त्यांचे मेहुणे सचिन नाईक यांच्यासह चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर राठोड राजीनामा देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला असला तरी देखील तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. थोड्याच वेळात मंत्रिमंडळ बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्री राजीनाम्या बाबात माहिती देतील असे सांगितले जात आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विरोधकांचा मोठा मुद्दा शिवसेनेने निष्प्रभ केल्याचे बोलले जात आहे.

Updated : 28 Feb 2021 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top