Home > Political > संजय राठोड अडचणीत?; आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाणसोबतच संभाषण पोलिसांच्या हाती

संजय राठोड अडचणीत?; आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाणसोबतच संभाषण पोलिसांच्या हाती

संजय राठोड अडचणीत?; आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाणसोबतच संभाषण पोलिसांच्या हाती
X

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी माझी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चीट देण्यात आल्याचा बातम्या येत असतानाच आता राठोड यांच्याविरोधात पोलिसांना मोठा पुरावा सापडला असल्याचे समोर आले आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने याविषयी बातमी दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येसाठी संजय राठोड जवाबदार असल्याचे आरोप विरोधकांनी केला होता. त्यांनतर यावरून चांगलेच राजकारण तापले होते. त्यांनतर राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर पोलिसांनी आपल्या तपासात राठोड यांना क्लीन चीट दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावत, तपासा सुरु असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यांनतर आता प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात आत्महत्येच्या पाच दिवस आधी झालेल्या फोनवरील संभाषण पोलिसांच्या हाती लागलं आहे. मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं चाललं होतं अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated : 2 Aug 2021 4:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top