Home > Political > अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती
X

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचं पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळालं. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार असून, तशी माहिती त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीसोबत बोलतांना दिलीय.

महराष्ट्रात रोज महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतांना राज्यात महिला आयोगचे आध्यक्षपद खाली असल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका होत होती. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होण्याच्या बातम्या येत होत्या. तसेच चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सुद्धा बोलले जात होते, मात्र अधिकृत नियुक्ती प्रलंबित होती. मात्र आता चाकणकरांची अधिकृत नियुक्ती झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated : 20 Oct 2021 1:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top