केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे महत्व सांगणारी जाहिरात केली होती. मात्र या जाहिरातीचा फज्जा उडाला आहे. कारण जो शेतकरी जाहिरातीतून नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगत होता तो आंदोलन करताना दिसत आहे. ही बाब समोर आल्यावर अभिनेत्री स्वरा भास्करने 'बहुत बेआबरू होकर तेरे कूचे से निकले!' असं म्हणत भाजपला चिमटा काढला आहे.आणखी किती खोटं बोलणार? असा थेट सवाल तिने भाजपाला केला आहे.
"आणखी किती खोटं बोलणार? ज्या शेतकऱ्याचा फोटो भाजपानं जाहिरातीत लावला तो व्यक्ती सिंधू बॉर्डरवर सरकारविरोधात आंदोलन करत आहे. आता पोस्टर बॉय तुम्हाला कायदेशीर नोटिस बजावणार आहे." अशा आशयाचं ट्विट करुन स्वरानं केंद्र सरकावर टीका केली आहे. तिचं हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Updated : 24 Dec 2020 7:30 AM GMT
Next Story