मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चेवर फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
X
मुंबई: बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या खासदार प्रितम मुंडे ( pritam munde ) यांची वर्णी लागली नसल्याने त्या आणि त्यांची बहीण पंकजा मुंडे ( pankaja munde ) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली असून, योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची बदनामी करू नका, असे फडणवीस म्हणाले.
केंद्रात संधी हुकल्याने मुंडे समर्थक सोशल मिडियावरून आपली नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांच्याकडून सुद्धा कोणताही अधिकृत खुलासा होत नसल्याने, चर्चेला अधिक बळ मिळत आहे.
पण यावर भाजपकडून मात्र खुलासा झाला असून, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेत असतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची बदनामी करू नका,असं फडणवीस म्हणाले आहेत.