Home > Political > फडणवीसांचा दौरा अन् पंकजा मुंडेंची अनुपस्थिती

फडणवीसांचा दौरा अन् पंकजा मुंडेंची अनुपस्थिती

फडणवीसांचा दौरा अन् पंकजा मुंडेंची अनुपस्थिती
X

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाहणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आजपासून दौऱ्यावर आहेत. मात्र याच दौऱ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित रहाणार नसल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चा पाहायला मिळत आहे.

फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असताना पंकजा मुंडे यांची उपस्थिती निश्चित समजली जात होती. मात्र, फडणवीस यांच्या दौऱ्याआधी पंकजा यांनी ट्वीट करत आपली तब्येत ठीक नसल्याचं म्हटलं आहे. तसंच, पुढील दोन दिवस आराम करणार असल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

यापूर्वी भाजपच्या महत्वाच्या आणि खास करून फडणवीस यांच्या अनेक कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे. त्यात त्यांच्या नाराजीची चर्चा सुद्धा अनेकदा समोर आली आहे. मात्र आज होणाऱ्या फडणवीस यांच्या दौऱ्यात उपस्थित न रहिल्याने पुन्हा एकदा चर्चा होऊ नयेत म्हणून, पंकजा मुंडे यांनी आधीच ट्वीट करून आपली तब्येत ठीक नसल्याचे स्पष्ट केलं असल्याचे बोलले जात आहे.

Updated : 2 Oct 2021 5:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top